तेहतीस वर्ष बँकेत आकडेमोडीशी गाठ पडलेल्या माझ्या सारख्या सामान्य माणसास स्वतःच दुः खाचे चटके सोसून रांधलेल्या,कष्टाने मिळविलेल्या भाकरीची गोडी अविट असते. वाचकांनी झंझाणीत कांदा फोडून या भाकरीचा आस्वाद घेताना, नकळत डोळ्यातून अश्रुही येऊ शकतील ....मात्र ह्याकरीता कवितेच्या वेदनेमागील भाव भावना प्रसंग माहीत असायला हवा .
ग्रंथप्रेमींच्या संग्रही असायलाच हवे आता बदलत्या काळात म्हणताही येत नाही. पण निदान ज्या फॉरमॅट मधे हा कविता संग्रह अव्हेलेबल असेल त्या फॉरमॅट मधे ओपन करून जमल्यास वाचून न आवडल्यास सोडून ही देता येइल. एकच बटन दाबुन एस्केप ही होता येइल असा हा कवितासंग्रह आहे.
कवितेस नाव मी दिले नाही . नाव ठेवण्याची जबाबदारी वाचकांची . - अरूण नेवे