//...ही कादंबरी तेहतीस वर्षापूर्वी लिहिली काही बदल करायचे होते ते बदल झाले नाहीत.नंतर मला प्रमोशन मिळत गेले व मी कामात गुंतून राहीलो. कार्यालयीन कामावर जास्त भार देत राहिलो व लेखन विसरलो. कादंबरीचं बाड एका कोपऱ्यात पडलं .निव्रत झाल्यानंतर त्या फाईली वरची धुळ झटकली आणि जशी आहे तशी कादंबरी, काहीही बदल न करता लिहून काढली.
ही कादंबरी तेहतीस वर्षांपूर्वी लिहिली आहे. त्यामुळे ह्यात जे प्रसंग आहेत ते त्या काळानुरुप आहेत. त्यामध्ये वाहतूक बैलगाडीने होते, लग्न मांडवात होतात,नदीचे पाणी भरले जाते, जेवण चुलीवर होतं, शेतामध्ये काम करावे लागते, शिक्षण सोय अपुरी असते.यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान घेतले नाही. मोबाईल, गाड्या,टिव्ही,डाँल्बी यांचा अभाव आहे. माझे बालपण खेड्यात गेले त्यामुळे यातले प्रसंग आम्ही अनुभवलेले आहेत.... //
तर अशी ही तेहतीस वर्षांपूर्वी लिहिलेली मुरलीधर देवर्डेकर ह्यांची कादंबरी "तीसरा जन्म"
ह्या तेहतीस वर्षांच्या काळात समाजात काही बदल झाले का?? आणि जर झाले तर कितपत झाले??
आपणच ठरवा....
लेखकांना आत्मचिंतन करायला लावणारी कादंबरी "तिसरा जन्म"