""पाऊस"" आणि ""कथा"" हे दोन शब्द जणू एकमेकांसाठीच बनले आहेत..
""पाऊस"" हा आबालवृद्ध सर्वांसाठीच आगदी जिव्हाळ्याचा विषय…आणि ""कथा"" तर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेच…
कथा म्हणजे एक मनोवैज्ञानिक ट्रीटमेंट!
तर असाच काहीसा विचार करून शॉपिज़न कथा स्पर्धा ""श्रावणधारा"" आयोजित करण्यात आली.
ह्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभणे हे निश्चितच होते, आणि खरोखरच साहित्याच्या श्रावणधारा
अगदी भरभरून बसल्या.. सर्व लेखकांच्या..वाचकांच्या प्रेमात आम्ही चिंब भिजलो!
80 हून जास्त कथा स्पर्धेसाठी आल्या होत्या.
आपण सर्व रसिक वाचकांसाठी उत्कृष्ट 45 कथांची निवड करून त्यांना ई-संग्रह रूपात, तीन भागात प्रकाशित करत आहोत.
हा भाग एक... नक्की वाचा आणि आपला प्रतिसाद द्या