""मी नारी नव्या युगाची
आहे सक्षम नि सबला
मी साक्षर उच्चशिक्षित
समजू नका हो अबला
आधुनिक युगातील ही नारी आज उच्चशिक्षित, सक्षम, साक्षर बनली
आहे. आपला घर संसार चालवण्यासाठी ती घराबाहेर पडली आहे. पुरुषांच्या
खांद्याला खांदा लावून ती आपला संसार चालवत आहे. सर्वगुणसंपन्न, हुशार
आणि बुद्धिमान असणारी महिला आज आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा
फोडत आहे आणि अन्याय सहन न करता त्यांना ती झुगारून लावत आहे.
""नारी तुच सबला"" या काव्यसंग्रहामध्ये नारीच्या विविध
वैशिष्ट्यांचे आणि गुणधर्मांचे वर्णन आपणाला काव्यरुपाने वाचता येईल. ज्येष्ठ कवयित्री भारती सावंत ह्यांची सुंदर कृती......