""नमस्कार वाचकहो,
माझा पहिला काव्यसंग्रह ‘गूज अंतरीचे’ आपल्या हातात सोपवताना मला खूप आनंद होत आहे. मी या काव्यसंग्रहात सकारात्मकता, नाती, प्रेम, विरह, निसर्ग इत्यादी नानाविध विषयांवरील काव्यपुष्पे गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या काव्यलेखनाच्या क्षेत्रातील पुढील वाटचालीच्या दृष्टीने रसिकांकडून या काव्यसंग्रहाचे कसे स्वागत केले जाते, त्यांचा कसा प्रतिसाद लाभतो याविषयी मला खूप उत्सुकता आहे. माझ्या 'अंतरीचे गूज' रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल या अपेक्षेसह वाचकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.......
- सौ.सायली कुलकर्णी, बडोदा""