माणसाचं अंतर्मन हे आरशासारखं असतं त्यामुळे आरशात उमटलेल मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणजे कविता.
आपण जसे असतो तशी कविता असते.साधी,सरळ,
सोज्वळ, बोजड,गूढ,
सूर्यप्रकाशासारखी लख्ख किंवा मनमोहक राधेसारखी निर्मळ....
ती मनात घुमते,
विचारावर राज्य करते,
वा-याशी मैत्री करते,ह्रदयात घर करते तर कधी मनाचा तळही हलवून सोडते...
तर कधी कविता फुल,वेली,चंद्र,चांदण्या,पाऊस,निरभ्र आभाळ, कडाडणारी विज तर कधी संध्या उषेचा लपंडाव,सुर्याची विविध रुपं तर कधी सागरात बुडताना त्याची होणारी लगबग, तर बुडताना होणारी त्याची शांत,शांत मुद्रा....
सगळच कस विलोभनीय, सुंदर,
कल्पनातीत पण वास्तवाचा वेध घेणारी होते कविता....
साध्या सरळ मुक्तछंदातील कविता...
निसर्गाशी नातं सांगणा-या साध्या भोळ्या कविता मी माझ्या या काव्यसंग्रहात तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय
तुम्हाला आवडतील अशी खात्री आहेच
-सौ.मानसी मोहन जोशी