कविता माझी सखी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझे जगणे कवितेने समृद्ध केले. जेव्हा जेव्हा भावना दाटून आल्या; संवेदना, जाणिवा, उत्कट झाल्या, तेव्हा तेव्हा त्या स्वैर होऊन काव्याच्या रूपाने व्यक्त झाल्या.
काव्यप्रकारात बाल कवितेपासून लावणी प्रकारा पर्यंतचे लिखाण मी केलेले आहे. मुक्त छंदातील कवितेपेक्षा मला गेय कविता अधिक मोहविते.
अभंग छंदापासून मुक्तछंदापर्यंत सगळ्याच अंगाने जाणाऱ्या कविता या संग्रहामध्ये
आहेत.
कु सुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, बा.सी. मर्ढेकर, फ. मुं. शिंदे या सर्व कविवर्यांच्या कविता सदैव माझ्या मनावर राज्य करतात.
या ठिकाणी एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. माझा पहिला कवितासंग्रह "इंद्रधनू" याची पाठराखण फ.मुं. शिंदे सरांनी के ली होती. इतकेच नव्हे तर त्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुद्धा त्यांच्याच हस्ते संपन्न झाले होते.
-उद्धव भयवाळ