निसर्गावरील कविता प्रत्येक माणसाच्या मनाला भावतात. निसर्गाची अशी काही जादू मनावर होते की माणूस सर्वकाही
विसरून जातो. असाच निसर्ग कवितांनी नटलेला सौ.भारती सावंत यांचा
"शोभा सृष्टीची" हा काव्यसंग्रह आहे. भारतीताई ह्या उत्कृष्ट कथालेखिका तर आहेतच पण त्या एक हळव्या मनाच्या उत्कृष्ट कवयित्री देखील आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहातील कविता वाचताना आपल्याला हे पदोपदी जाणवत राहते.
हिरवागार निसर्ग श्रावणधारांनी फुलत जातो. मनाला त्या गार वाऱ्याची झुळूक पुलकित करून जाते. तसेच काहीसे काव्यसंग्रहातील पावसावरील कवितांनी मन चिंब होऊन जाते. अशा या निसर्गसौंदर्याने
नटलेल्या ५० कविता नक्कीच वाचकांना निर्भेळ आनंद मिळवून देतील. आणि हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी खात्री आहे,.