वाचक हो, आपण ज्या पर्यावरणात राहतो त्याचं काही ना काही देणं लागतो. हल्ली विकासाच्या दृष्टीने मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडवून टाकले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज आपणास ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे. माझ्या लेखातून मी नेहमी पर्यावरण, निसर्ग आणि माझ्या बालपणा विषयीच्या जतन केलेल्या
आठवणीं विषयी लिहीत असते. त्यातून समाज प्रबोधनही होते. वाचकांना विचार करायला लावणारे असे माझे लेख खूप भावतात देखील. माझ्या "अक्षरगोंदण" ह्या पहिल्या लेखसंग्रहात असेच लेख आहेत.
-सौ. भारती दिलीप सावंत