//....आज म्हणलं माती व्हावं
कुंभाराच्या पोटासाठी त्याला एक मडकं द्यावं
कधीतरी कोणासाठी मातीचं एक घरटं द्यावं
... आज म्हणलं माती व्हावं
कोंब कोंब पिकांची गं मायाळू मी माय व्हावं
पेरलेल्या दाण्याचं मी पोटात थोडं पाय घ्यावं
... आज म्हणलं माती व्हावं
मूर्ती बनून कुणासाठी कधीतरी देव व्हावं
राम ,कृष्ण,विठ्ठल कधी रुक्मणीचे नाव घ्यावं
... आज म्हणलं माती व्हावं
मूर्ती बनून विठ्ठलाची पंढरपूरी दूर जावं
माझे नाव जपता जपता दुःख कसे दूर व्हावं
... आज म्हणलं माती व्हावं.
फक्त देणे, देणे देऊन दुसऱ्यासाठी ऋण व्हावं
कधी पाऊस वारा तर कधीतरी ऊन व्हावं
... आज म्हणलं माती व्हावं..... ///
#गाव_आणि_बरेच_काही.....
वैभव कुलकर्णी ह्यांची अप्रतिम कृती