"दहा भावपूर्ण गोष्टींचा संग्रह म्हणजे ""भावपुष्प द्वितीय"". ह्यात देवाला पण काही दुःख असू शकते आणि दुःखात पण माणूस प्रेमळ माणसाला कसे जपतो ते खूप छान रंगवले आहे एवढेच काय पक्ष्यांचं प्रेम, आईचे प्रेम,आणि वयस्क लोकांचे प्रेम कसे वेगळे असूनही तत्व एकच...प्रेम.
नराधमाला मिळणारी शिक्षा ""कर्मफळ"" आणि अतीचातूर्यने कठीण प्रसंगातून ""लिफ्ट"" घेणे..एवढेच काय एका लग्नातील पंगत आणि रसाचा आस्वाद असे बरेच काही आहे ह्या भावपुष्प मधे. प्रत्येक गोष्ट वेगळा भाव ..गोष्टीच्या अंत पर्यंत पोहचाईची उत्कटता.❤️ अंत अपेक्षे पेक्षा वेगळा...मनात उमलत राहणारा असा....भाव पुष्प""