"वैभव कुलकर्णी ह्यांच्या ह्या चौथ्या कवितासंग्रहात आपल्याला काही
प्रेम, वात्सल्य , विरह यावरील कविता वाचायला मिळतील . कविता आपल्याला लिहायला शिकवते , जगायला शिकवते , .. कविता आयुष्य शिकवते ..
हिरव्या पानासारखे असावे आयुष्य
पाऊस ऊन्हासारखे असावे आयुष्य
सुखांची पिके झुलावीत प्रत्येक क्षणी
आनंदी रानासारखे असावे आयुष्य . ..."