"""सर्व वडीलधाऱ्यांना समर्पित
१९२ दर्जेदार कवितांचा संग्रह: करुणासागर बाप
संकलन व संपादन: प्रज्ञा बागुल
प्रज्ञाताई घोडेस्वार-बागुल यांनी संपादन केलेला बाप नावाचा कवितासंग्रह मराठी कवितेच्या इतिहासातील नवा प्रयोग आहे. आईचा सन्मान संस्कृतीच्या पानापानावर सर्वांनीच केला पण बापाची मात्र कळत नकळत उपेक्षाच झाली. त्याच बापपणाची सर्वार्थाची थोरवी मातृत्वाच्या समांतर पण सुसंवादी जाणिवेतुन प्रज्ञाताईने या संपादनात अधोरेखीत केलीय. त्यांच्या या सांस्कृतीक कामगिरीमुळे समस्त पिढ्यांच्या बापपणाला काव्यात्मक पातळीवरील न्याय मिळालाय अर्थात यापुर्वीही अपवादात्मक प्रयोगात बाप सन्मानित झालाय.
- डॉ. श्रीपाल सबनीस,
अध्यक्ष
८९ वे मराठी साहित्य संमेलन"