"या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.
त्यांचे वैशिष्ट्य असे की,यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून ,प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे.
षटकोळी,कृष्णाक्षरी,शोभाक्षरी,शंकरपाळी, नीरजा,मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात.
प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी,यमक,वर्ण अक्षरं,शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे
संपूर्ण तपशील यात दिले आहेत.त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते.आणि वाचकाला त्या रमवतात."