"लो. टिळकांनी शाळेत असताना शिक्षकांना ठाम उत्तर दिले होते, ""मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही."" मोठ्यांची ही लहान गोष्ट, पण त्यामुळे ब-याच जणांना प्रेरणा मिळाली, ओजस्विता देऊन गेली, म्हणून ती गोष्ट ही मोठी झाली. असे अनुभवाचे शेंगदाणे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण बऱ्याच वेळा त्या टरफलातील म्हणजेच वास्तविकतेची (factual), त्यातील प्रेरणा, सकारात्मकता जाणून न घेता ती टरफलं आपण फेकून देतो. काही दैनंदिन आयुष्यात आलेले अनुभवांचे शेंगदाणे (माझ्या, इतरांच्या आणि आजूबाजूला पाहिलेल्या) आणि त्यातून मिळालेले सकारात्मक भावांची टरफलं यांची एक सदररूपी मालिका मी प्रस्तुत करत आहे. आशा आहे, ते वाचून माननीय रसिक वाचकांना माझ्याप्रमाणेच त्यातून काही प्रेरणा अथवा सकारात्मकता मिळेल.
- धन्यवाद
- दीपा वणकुद्रे"