कविता वाचताना प्रकर्षाने जाणवतं की त्यात कुठलीही कारागिरी नाही. बऱ्याच वेळा कवी वर्गाकडून कल्पकता, शब्दभांडार आणि त्याचा दिखावा अशी अपेक्षा केली जाते पण अर्चनाच्या कविता साध्या शब्दात आणि साधे आशय असूनही लोकांना आवडतात. कवी संमेलनात तिच्या कवितांना भरपूर दाद मिळालेली मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. अशीच एक कविता आहे -- नोकरी नको. ही कविता वरवर सोपी, सरळ आणि स्वगत असल्यासारखी भासत असली तरी शेवटाला ती एक वेगळ्या उंचीवर पोहचलेली दिसते.
नोकरी नको आता
चाकरी करीन म्हणते
सामावले सारे विश्व ज्यात
तो राम जपीन म्हणते
नको देहबंध सारे
विदेही होईन म्हणते
-अलकनंदा साने, इंदौर.