"""कधी कधी शब्द सुचत नाही. भावना कोणत्या शब्दात व्यक्त कराव्या, हा गुढ पडतो मनाला.
""""पदरगाठ"""" ही फार पुर्वी, साधारणतः २०१५ मधे लिहीलेली """"आत्मकथनात्मक कादंबरी"""".
विषय- घरगुती हिंसाचार, कौटुंबिक कलहावर आधारीत एका महिलेच्या जीवनाची कथा.
""""कौटुंबिक गोष्ट"""" """"पारिवारिक गोष्टींच्या"""" नावावर समाज व कायद्याने, एका विवाहित महिलेचा, तिच्या सासरच्या लोकांना, सुन, भावसुन, भावजी, जाऊ, पत्नी या नावाखाली, छळ करायची दिलेली परवानगी.
भारतीय कुटूंब व्यवस्था पुरुषप्रधान संस्कृती व मानसिकतेची असल्यामुळे, पुरूषाच्या घरचे अर्थातच नवऱ्याच्या घरचे, परिवारातील लोकांचे घरी येणाऱ्या सुनेबद्दल कसे ही वर्तन, विचार असले म्हणजे घरात येणाऱ्या सुनेला अर्थात पत्नीला पोषक वातावरण देणारे नसले तरी ही चालते. तिने ब्र न काढता, फक्त तिच्या नवऱ्याचा अर्थात पुरूषाचा परिवार आहे म्हणून, मुकाट्याने सगळं सहन करत राहावं. तर ती कुटूंब सांभाळणारी आदर्श सुन किंवा पत्नी ठरते. आणि हे तिने फक्त या साठी करायचे, कारण तो पुरूषाचा परिवार आहे. कदाचीत यालाच पुरूष प्रधान संस्कृती व मानसिकता म्हणत असावे.
या कादंबरीच्या कधीही न विसरणाऱ्या आठवणी शेयर करते.
माझे मुळ गाव वरठी येथील तथागत ग्रंथालयात, ग्रंथपाल म्हणून काम करणारी माझी मैत्रीण अनीता मेश्राम. ही सुरवातिच्या कालखंडात माझ्या साहित्याची पहिली वाचक व मार्गदर्शक.
पहिली कादंबरी """"दयाघना"""" यात कादंबरीचा शेवट करण्याचा तिनेच दिलेला सल्ला.
परंतू जेव्हा """"पदरगाठ"""" लिहून झाल्यावर तिला वाचायला दिली, तीने अर्धीच वाचून परत केली. व भारी मनाने,
""""मी नाही वाचू शकत हिला, जेवढं वाचल, त्याच्यापूढ वाचायचं धाडसच होत नाही. तेवढी हिंमत माझ्यात नाही."""" बोलली.
एक मात्र, माझी मानस बहिण """"कल्पना वाहुळे"""" यांनी मात्र तिला पूर्ण वाचण्याच धाडस केलं. आणि, """"काय म्हणावं अशा लोकांना, माणसं की पशू"""" आपली खंत व्यक्त केली.
मी १०१६ मधे पहिल्यांदा श्रामणेरी बनली, तीथ मात्र एका व्यक्तींचा परिचय झाला. आज नाव विसरली मी. परंतू त्या एका महिण्याच्या दरम्यान त्या सदगॄहस्थाने या कादंबरीचे प्रुफ रिडींग करून देण्याचे खूप मोठे कार्य केले.
जेव्हा त्यांना विचारलं,
""""सर कथानक कसं वाटलं""""
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येणारे भाव म्हणजे, सत्यता मांडण्याची सोय नाही व खोटं बोलण्याची हिंमत नाही. निर्वीकार.
मात्र एका प्रकाशनाकडे पाठवले असता, पुण्यातील एक महिला, प्राध्यापक होत्या. नाव नाही आठवत, हे कथानक वाचून त्यांनी एक सल्ला दिला.
""""तुम्ही न यामधून काही मॅसेंजींग मांडा. कुटूंबा बद्दल छान छान लिहा. समाजात कुटूंबाची चांगली बाजू मांडा. ही थिम बदलवा. समाजाला कुटूंबाचा चांगला रूप दाखवा. व त्या स्त्रीला त्यामुळे खूप यशस्वी झालेली दाखवा""""
आता जर हे कथानक काल्पनिक असते, तर सगळं छान छान दाखवलं असतं. चित्रपटात दाखवतात तसे.
पण हे काल्पनीक नव्हते.
ती एका स्त्री ची वास्तविक जीवनी होती.
तिने भोगलेला त्रास होता. तिने या व्यवस्थेशी पुकारलेले बंड होते. प्रतिकूल परिस्थितीत स्वताचा केलेला विकास होता.
संसारात घडोघडी सोसलेला अपमान होता.
शुन्यातून निर्माण केलेला संसार होता.
त्यात पावलो पावली सोसललेल्या यातना होत्या.
आणि अखेर यातून तिला जडलेल्या शारीरिक व्याध्या. आणि वयापरत्वे ढासळत गेलेली मानसिक अवस्था. एक प्रकारे जडलेले मानसिक रोग.
तो कसा काय बदलवणार?
या सगळ्यामुळे योग्य प्रकाशना अभावी ७ वर्ष रखडून राहिलेली माझी ही ४ कादंबरी, व साहित्यातील आठवे पुस्तक,
आज २६ जानेवारीच्या पर्वावर, शाॅपिजन अॅपवर प्रकाशीत झाले आहे.
अवश्य वाचावे. व अभिप्राय द्यावे.
-अस्मिता प्रशांत 'पुष्पांजलि'