"सौ.भारती सावंत रचित सहज गुणगुणायला लावण्याऱ्या लावण्यांचा साज आपणासाठी उपलब्ध करून दिला आहे. होनाजी बाळा,पठ्ठे बापुरावांपासुन ते हल्लीच्या पिढीतील समस्त लावणी कारांनी आपल्या दिलखेचक शब्दफेकीने रसिकांना झुलायला लावले आहे. चला तर मग लावणीकारा सौ.भारती सावंत यांच्या लावण्यांचा आस्वाद घेत जगातल्या दु:खांना विसरून जावूया. अंहं वाचता वाचता ओठांची शीळ वाजवून लावण्यांना वाह! सुंदर! अशा शब्दांनी दाद देऊ.
नवरसांचे पान करता लावण्यां वाचण्याची मजा लुटू."