"किशोरवयात मनाची दुविधा असते . पूर्ण परिपक्व मन नसतांनाही मृगजळी भास असतो .मोठे झाल्यांचा, त्या अल्लड वयात शब्दांशी खेळणे मला आवडायला लागले . पण ती कविता मी आणि माझी डायरी ऐवढीच मर्यादीत होती. मी लिहीते हे माझ्या घरी माहीती होते पण मी कधी मोकळेपणाने दाखवली नाही आणि माझ्या घरच्यांनी विचारले नाही .
माझा छंद हा माझ्यापुरता मर्यादितच होता . माझे लग्न झाल्यावर एक दिवस माझ्या पतीला माझ्या लिखाणा विषयी माहिती पडले . माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणजे माझी डायरी त्यांना मिळाली . त्यांनी मी लिहिलेल्या कविता वाचल्या व लिखाणासाठी खूप प्रोत्साहन दिले . त्यानंतर माझ्यात आत्मविश्वास जागा झाला , मी लिहिलेल्या कविता दुसऱ्यांनाही आवडतात . माझ्या पतीनेच मला लिखाणाच्या वाटा मोकळ्या करूण दिल्या आणि आज जवळपास १३०० कवितेचा संग्रह माझ्याजवळ आहे . यापैकी काही निवडक कविता मी तुमच्या समोर घेऊन येत आहे.- मनीषा आवेकर"