साहित्य वैश्विक जाणीवांचा आधार" हा प्रा. प्रज्ञा घोडेस्वार-बागूल यांचा समीक्षा ग्रंथ आहे. समीक्षा ही लेखक- वाचक यांच्यातील दुवा असते. विवेकाची भुमिका ठेऊन प्रा. प्रज्ञा घोडेस्वार-बागूल यांनी पुस्तकांची परीक्षणे केली आहेत. त्यांची कलाकृतींची चिकित्सा महत्वपुर्ण आहे. त्या कलाकृतींचे वेगळेपण, सौदर्यस्थळे त्याबरोबरच कलाकृतीतील आकलणाच्या दिशा, रिकाम्या जागा, शक्यता आणि संभवनियता, त्याबरोबरच लेखकाचे स्थान अधोरेखन, त्याच्या उणीवा, मर्यादा, यांच्यावर परखडपणे भाष्य करत जाणे, त्याबरोबर फार पारिभाषिक संज्ञात न अडकता सहज सुलभ आकलनासाठी वाचकाला कलाकृतीशी जोडून घेणे, त्यांच्या अभ्यासशैलीचा एक भाग आहे. त्यामुळे एका कलाकृतीच्या समग्र अंतरंगाचे दर्शन होत असताना ही समीक्षा कधी आकलन आस्वादाच्या पातळीवर जाते तर कधी चिकित्सा करताना शास्त्रीय पातळीवर जाते.