सौ.भारती सावंत यांनी स्त्रियांच्या जीवनावर लिहिलेलं "झुंज नारीत्वाची" हे आगळं वेगळं पुस्तक आहे. पुरूषप्रधान व्यवस्था काय आहे? तर ती राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक संदर्भात स्रियांचेे शोषण करणारी व्यवस्था आहे असे विचार त्यांनी आपल्या लेखांतून मांडलेले आहेत .या व्यवस्थेचे आकलन झुंज नारीत्वाचीमधील लेख करतात