नीतिशतकम् या ग्रंथात १०० पेक्षा अधिक श्लोकांमधून सज्जनांची लक्षणे, मूर्खांची लक्षणे, विद्वानांची लक्षणे, कर्माचे महत्व, सत्कर्माचे महत्व, सुसंगतीचे महत्व इत्यादी विषयांवर उद्बोधक विचार मांडले आहेत. शिक्षक, विचारवंत, अभ्यासक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि पालक अशा सर्वांसाठीच उपयुक्त असे हे श्लोक आहेत. यातील श्लोक, त्यांचे अर्थ आणि ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांचे निरूपण असा हा ग्रंथ निश्चितच संग्रहणीय आहे.