सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे बा.भ. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे सौ.भारती सावंत लिखित रचनेला सूर देतील. त्याचे गाणे होईल. इतकी भावोत्कटता जपली आहे. सुबोधता स्पष्ट आहे. स्त्री मनाच्या वेदना, भावना, संवेदना स्त्रीनेच स्त्रीच्या भूमिकेतून मांडल्या तर अधिक प्रभावी ठरतात तद्वतच कालानुरूप त्यात बदलही संभवतो.