महाराष्ट्रातील सर्व संतांच्या चरणी अर्पण अभंग संग्रह :या संग्रहात साकारलेल्या आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व,कधी वारकरी बनून जीवाला लागलेली विठुरायाच्या भेटीची आस,तर कधी गणेशाच्या भक्तीत तल्लीन होवून आशीर्वाद मागण्या हेतू केलेली प्रार्थना. यालाच जोड म्हणून गुरूंची केलेली आराधना अन् साहित्यात आगळावेगळा ठसा म्हणून माता सरस्वती कडून साहित्य क्षेत्रात नावारूपास येण्या हेतू केलेली आशीर्वादाची मागणी, खरंच काळजात अढळ स्थान निर्माण करून जाते.