"""""""Where the mind is without fear
and the head is held high.....//""""
Rabindranath Tagore
रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या ह्या अजरामर ओळी वाचून स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजतो.. आणि दिसतात, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटणारे विविध व्यक्तीमत्त्व… !
खरे स्वातंत्र्य म्हणजे निर्भय मन.. !
मनाप्रमाणे ताठ मानाने जगण्याचे स्वातंत्र्य, ज्ञान संपादनाचे स्वातंत्र्य, खरे बोलण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य.. विचार करण्याचे व ते विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, आपली ओळख पटवून देण्याचे स्वातंत्र्य, प्रेम करण्याचे स्वातंत्र्य, एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध बोलण्याचे स्वातंत्र्य, संकीर्ण विचारधारा, जुनाट परंपरा सोडून क्षितिजापर्यंत झेप घेण्याचे स्वातंत्र्य… !
अश्याच काही कथा सामील आहेत, या पुस्तकात!
स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे भाग 1