या बालकविता संग्रहात निरनिराळ्या प्रकारच्या एकूण पंचवीस कविता सादर केलेल्या आहेत. कविता संग्रहाची सुरूवात गणरायाला वंदन करून केलेली आहे. निसर्ग हा आपला मित्र आहे. निसर्गाशी नाते जोडून आपण निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. निसर्गातील आनंद आपण उपभोगला पाहिजे. हे निसर्गसोबती, आनंदगीत आणि प्रभात या कवितांमधून वाचयला मिळेल. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या कवितासंग्रहाची नक्कीच मदत होईल असे वाटते. या कवितासंग्रहाचा आनंद मुलांसोबत पालकांनी पण जरूर घ्यावा ही आग्रहाची विनंती आहे. हा कवितासंग्रह मुलांमध्ये मराठी वाचनाची आवड उत्पन्न करेल अशी आशा व्यक्त करते. लहान मुलांच्या संग्रही असावा असा हा बालकविता संग्रह आहे.