"मोरपिशी मोहक स्वप्न, गंधार शामरंगी, नभ निळे-सावळे,
भगव्या पताका, शुभ्र लिली, हळवी गुलाबी गाणी, मनमंजिऱ्यांची आरास,
अपार्थिव सौंदर्य, रंगरेषांचेजग, पाचूची नव्हाळी, सप्तरंगी झुंबर, धारांमधले
झिम्मड नाते या आणि यासारख्या हळव्या, भावविभोर आणि रंगेबेरंगी
प्रतिमांचा साज लेऊन या कविता चितारल्या गेल्या आहेत. एकांताचा
परिसस्पर्श झालेल्या या कविता म्हणजे मोहक, आकर्षक अन तरीही
काहीसा गूढ असा ""जांभळा घन"" आहे. आणि त्या जांभळ्या घनास
कवयित्री आपलेसर्वस्व समजत आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे....!! -डॉ. नयनचंद्र सरस्वते, पुणे"