"यशस्वी उद्योजक हे समाजाची गरज ओळखून ती योग्य वेळी, योग्य स्थळी व योग्य मोबदला घेऊन, स्वार्थाची तमा न बाळगता पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा करतात. प्रसुतीच्या वेदना व त्यांचा अनुभव हा शब्दात व्यक्त होत नाही, पण सुदैवाने उद्योजकांच्या वेदना व अनुभव अशा प्रकारच्या पुस्तकातून मांडता येत असल्याने, भावी पिढीमध्ये या पुस्तकाचा उपयोग होऊन अनेक यशस्वी उद्योजक तयार होतील हा माझा विश्वास आहे.
(श्री.विठ्ठल कामत लिखित प्रस्तावनेतून साभार)"