"या कवितासंग्रहात विविध प्रकारच्या एकूण ५३ आशयघन अष्टाक्षरी रचना समाविष्ट आहेत. रसिकांना माहित असेलच की अष्टाक्षरी प्रकारात एका ओळीत किंवा चरणात फक्त ८ अक्षरे असतात व प्रत्येक चरणातील किंवा ओळीतील पहिला शब्द हा सम अक्षरी म्हणजेच २/४/६/८ अशा अक्षरांचा असतो. साहजिकच एका चरणात २,२,२,२ किंवा २,३,३ किंवा २,२ अथवा २,४,२ अथवा ४,४ किंवा ६,२ वा २,६ अशीच अक्षरे साधारणपणे येतात. इतकी बंधने पाळून अर्थपूर्ण, लयबद्ध व गेय रचना करणे सोपे काम नाहीच. पण हे शिवधनुष्य सौ. भारतीजींनी लीलया पेलले आहे.
या संग्रहात त्यांच्या एकूण ५३ रचना आहेत "