" जीवन एक रंगमच ' हा सौ.भारती सावंत यांचा लेखसंग्रह खरोखरीच जीवनाच्या रंगमंचावर कसे जगायचे याची शिकवण देणारा आहे.
मानवी आयुष्य बालपण, तारुण्य, प्रौढत्व व वृद्धावस्था या अवस्थांमधून जात असते. त्या प्रत्येक टप्प्यावर सुंदर रीतीने आनंदी आयुष्य कसे जगायचे ते आपल्याला या पुस्तकातून कळते कारण या पुस्तकाचा आवाकाच तितका मोठा आहे.
लेखिकेने जवळपास सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सांस्कृतिक अशा सर्वच महत्वाच्या विषयांवर आपल्या लेखांतून प्रकाश टाकला आहे.
या लेखसंग्रहात एकूण ४० सर्वांगसुंदर, उत्तमोत्तम लेख आहेत. जे आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात तर कधी कुटुंब व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात तर कधी सळ्सळत्या रक्ताच्या तरुणाईची भाषा बोलतात तर कधी प्रबोधनाची समशेर हातात घेवून जुन्या रुढी, परंपरा, अज्ञान, अंध:कार व अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार करतात.
एकूणच काय तर सौ. भारतीताईंची लेखणी ही अगदी मुक्तपणे चौफेर फटकेबाजी करताना या पुस्तकात आपणास आढळते. -प्रा. विजय काकडे, कथा लेखक