माणसाच्या जैविक आणि सांस्कृतिक विकासक्रमांच्या इतिहासावर दृष्टी टाकताना परिवर्तनाचे प्रकार, त्याची कारणे यांचा विविध पातळ्यांवर शोध घेऊन पुढील वाटचाल कशी करावी याचे विश्लेषणात्मक लेख म्हणजे वाचकांना तर मेजवानी आहेच पण समाजात राहणा-या प्रत्येकाने समाजाचे, आसपासच्या परिसराचे, निसर्गाचे आभार मानुन व मानवरुपी स्नेहबंधाची नाळ जपण्याचा आपुलकीचा व मोलाचा संदेश त्यांनी या पुस्तकातुन दिला आहे.
एक साहित्यिका, स्पेशल एज्युकेटर व समाजसेविका या नात्याने माझ्या मते हे पुस्तक वाचकांसाठी व जनतेसाठी साहित्याची पर्वणी तर आहेच. त्याच सोबत समाजाला उत्तम दिशा व प्रगतीचे दालन दाखवणारा प्रकाशदिवाही आहे.
-सौ. ज्योती श्रीकांत कुलकर्णी, मुंबई, लेखिका, स्पेशल एज्युकेटर व समाजसेविका