"....मी कवयित्री नाही.... मला कोणी विचारले की तू कविता करते का? तर मला नाही सुचत हो म्हणावे की नाही!
एखादा क्षण..एखादा शब्द.. सुख.. दु:ख.. आनंद.. किंवा एखाद्या भावनेचा अतिरेक झाला की काहीतरी लयबद्ध विचार येतात, कधी कागदावर उतरतात तर कधी मनाच्या अंगणातून पाखरे बनून उडून जातात....
अशी कितीतरी पाखरे उडून गेली, दिसेनाशी झाली.... काही मात्र मी धरून ठेवली..
आणि तीच ह्या संग्रहात सादर करतेय..!. . . //
ऋचा दीपक कर्पे ह्यांच्या निवडक कविता """"आभास"""""