१५ ऑगस्ट २०२१ पासून आपला भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना मी एक संकल्प केला होता. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, घरादारावर तुळशी पत्र ठेवून बलिदान करणाऱ्या परिचित -अपरिचित क्रांतिकारकांच्या कथा लोकांसमोर आणावयाच्या.अशा कथा लिहून व्हाट्सअप द्वारा अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला. 'वंदन क्रांतिकारियों को,' हे पुस्तक माझ्या वाचनात आले या कथा वाचताना मी अवाक् झाले. खेडेगावातील माणसे, आदिवासी १२/१२वर्षांची बालके,स्रिया कोणीच या यज्ञकुंडात आहुती देण्यापासून मागे हटले नाहीत. अशा सर्व क्रांतिकारकांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही .पण थोडे तरी उतराई व्हावे ,भावांजली वहावी,श्रद्धा अर्पण करावी या हेतुने या कथा सादर केल्या आहेत. "वंदन क्रातिकारियोंको"या पुस्तकाचे लेखक श्री सहस्त्रबुद्धे आपल्यात नाहीत, परंतु मी श्री रवींद्र शंकर जोशी -नागपूर यांच्या मान्यतेने, परवानगीने हे मराठी पुस्तक लिहू शकले त्यांची मी खूप खूप आभारी आहे. - विद्या रानडे