वाटेगांवची सुवर्ण संस्कृती,परंपरा,वैभव,सुख-समृद्धी "वाटेगांवच्या माथ्यावर भाग-१" या कथासंग्रहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा समृद्ध प्रयत्न,आजच्या नव्या पिढीला आधुनिक विश्वाची जोड नक्कीच लाभली,हे आपल्याला पक्केच माहित आहे.पण या आधुनिकतेला शक्तीशाली भुतकाळाची दावेदारी मान्य करावी लागली.
याच अनुषंगाने भुतकाळाच्या इतिहासाची कबर उखलुन ऐतिहासिक युगाचा खजिना नवयुवकांपुढे मांडण्याचा प्रयत्न जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील(भाऊ),एम.आर.पाटील(सर) आणि मी,आम्ही तिघेजण गेले दोन वर्षे झाले करत होते.