मानवी मन नकारार्थी भावनांकडे , अनुभवांकडे सहज स्वाभाविक आकृष्ट होते. त्यासाठी सगळं "आपोआप" घडत असते. सकारात्मकता मात्र शिकावी लागते, अंगी बाणवावी लागते. तिचे धडे घेऊन ते आचरणात आणावे लागतात. सगळ्यांचे जीवन अनेक प्रकारच्या अनिश्चितता, अनैसर्गिक घटनांनी वेढलेले असताना, तिथे सकारात्मक विचार रुजविणे हे अवघड काम घरातील, शाळेतील आणि परिसरातील अनुभवांमुळे संपन्न करावे लागते. एकदा "सकारात्मकतेला" जीवन विषयक तत्वज्ञान बनविले की प्रवास शांत, स्थिर, सुखद आणि आनंदी बनत जातो.