"सकारात्मक विचार करा, जीवन सुंदर बनवा
सकारात्मक विचारसरणी तुमच्या जीवनात वापरण्यासाठी टप्याटप्याने प्रयत्न केले पाहिजेत.
या गोष्टी एकदम येतील असे नाही. नकारात्मक व्यक्ती कोणत्याही परिस्थितीची नकारात्मक बाजू पहाते. त्यामुळे ती जीवनात दुःखी असते. लक्षात ठेवा की कठीण परिस्थिती एखाद्या मोठ्या ढगाप्रमाणे असते. ढग कितीही काळा असला तरी प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते.
नकारात्मक व्यक्ती काळा ढग पहाते तर सकारात्मक व्यक्ती त्यांची रुपेरी किनार पहाते. हा पहाण्यातील बदल त्याच्या जीवनात बदल घडवितो. त्यामुळे नेहमी परिस्थितीच्या उजळ बाजूकडे लक्ष केंद्रित करा. तुम्हाला कधीही परिस्थिती वाईट आहे असे वाटणार नाही.
गालिबचा शेर आहे- ‘मै लगा रहा था उम्र, परिस्थिती बदलने को गालिब, जिस दिन मनस्थिती बदली, उसी दिन परिस्थिती बदली.’ तेव्हा मनस्थिती सकारात्मक ठेवा, परिस्थिती निश्चितपणे तुम्हाला अनुकूल होईल.
"