"#अंबेडकरनगर
""प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांनी चित्रित केलेल्या या सर्व स्रीया सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या बुद्ध आणि बाबासाहेबांचे आदर्श घेऊन जगणाऱ्या आहेत. आंबेडकरी भारत बनविण्याचे स्वप्न घेऊन वावरणाऱ्या जागृत स्रीया आहेत. कथनात्मक शैली आहे. सामान्य माणूस आणि सत्ताधारी माणूस या कथेत ही शैली प्रभावीपणे दिसून येते.""
डॉ. इंदिरा आठवले
नाशिक
""प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांच्या सर्वच कथा आवाहक व प्रभावी आहे. कथा आकाराने लघु असल्या तरी आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर आंबेडकरी मुल्यभान जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
प्रा. डॉ. आशा थोरात
अमरावती.