स्त्रीची अनेक रुपे आहेत. ती आई, बहीण, मैत्रीण , पत्नी आणि मुलगी या रुपात आपली कामगिरी चोख बजावते. आजच्या बदलत्या काळानुसार तिने स्वःताला ही बदलले आहे. आज ती फक्त चुल आणि मुल इतपतच मर्यादित राहिली नाही तर ती घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मग यामध्ये तिला येतील त्या संकटातून मार्ग शोधून आपले काम चोख बजावते. जरी स्त्री कमी शिकलेली असेल तरी तिच्या अंगी असलेल्या अवगत गुणांनी ती आपले कार्य उत्तमरीत्या पार पाडते. अशाच स्त्रियांनी आपल्यासमोर येणाऱ्या संकटावर मात करून गड जिंकून घेतले अशा आशयाच्या कथा मानसी या कथासंग्रहामध्ये आहेत. नारी तुच हो स्वयंसिद्धा आणि तुच आहेस खरी रणरागिणी.आपणास हा कथासंग्रह नक्कीच आवडेल ही अपेक्षा आहे.
©® परवीन कौसर
बेंगलोर