पालकत्व म्हणजे जबाबदारी असं समीकरणच तयार झालंय आणि जबाबदारी म्हंटल की आपल्या पाठीवर भलं मोठ्ठं ओझं कुणी लादलंय की काय अशी जाणीव होते. सगळेच पालक आपापल्या परीने जीवाची पराकाष्ठा करून ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतातच पण कुठेतरी काहीतरी राहून जातंय, आपण कुठे कमी पडतोय का? असं बऱ्याचदा वाटतं, विशेषतः पाल्य जरा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर जास्तच जाणवतं. आपल्या पार्टनर सोबत असलेलं बॉंडिंग, नात्यामध्ये उडणारे खटके याचा सुद्धा परिणाम नक्कीच पालक आणि पाल्य दोघांवरही होतो. या सगळ्यावर भाष्य करणारं आणि 'पालकत्व' या जबाबदारीचं ओझं ओझं नसून तो एक छान प्रवास आहे हे सांगणारं पुस्तक.