पुरातन काळापासून प्रत्येक
सासुरवाशिणीच्या मनात माहेरची खूप ओढ असते.माहेराच्या ,तिथल्या सग्यासोयऱ्यांच्या आठवांनी तिचे डोळे ओलावतात. तिला तिचे बालपण आठवते.बालपणी खेळलेले खेळ, वडाच्या पारंब्यांवर झूललेले झूले हे सर्वकाही आठवते अन् तिचा मनमयूर माहेरी जाऊन पोहोचतोही.
माहेरातले प्रेम,माया आणि वात्सल्य आठवत ती सुख शोधत रहाते.माहेरच्या खिल्लाऱ्या बैलजोडीचा, वडील आणि बंधूंच्या मानापानाचा तिला भारी अभिमान असतो.माझा "" माझ्या माहेराच्या वाटे"" शीर्षकाचा काव्यसंग्रह प्रत्येक स्त्री आणि मुलींना नक्कीच वाचावासा वाटेल.