"""'भाकीत' हा सौ.भारती सावंत यांचा तीस कथांचा प्रस्तुत कथासंग्रह त्यांच्या लेखन कौशल्याची सर्वाथाने ओळख करून देणारा आहे. त्यांच्या कौटुंबिक आणि समाजजीवनाच्या सुक्ष्म निरीक्षणाची तसेच व्यापक अनुभवाची त्यांच्या कथांमधुन प्रचिती येते. एक समृद्ध ग्रामजीवनाचा आणि शहरी व्यवहारिकतेचा समंजस परिपाक म्हणजेच 'भाकीत' कथासंग्रहातील कथा होत. या कथांमधील विषय हे सार्वत्रिक आढळणारे असले तरी त्यांची या विषयांना कथारूप देण्याची शैली विलक्षण नि भन्नाट आहे. या कथांमधील वर्णने कथांची पार्श्वभूमी साकार करण्यात यशस्वी झालेली इथे पहावयास मिळते तर त्यांची संवाद लेखणाची पद्धती व्यक्तिरेखांना जिवंत करणारी आणि त्यांची मनोदशा समर्थपणे गोचर करणारी ठरते.""