कोणत्याही मोठया कंपनीतील महत्वाच्या विषयांवर चर्चा कुठे होते, निर्णय कुठे घेतले जातात असं विचारलं, तर उत्तर येतं बोर्डरूम. मोठमोठ्या कंपनीतील अनेक अनाकलनीय गोष्टी घडत असतात. म्हणजे उदाहरणार्थ बोइंग, लॉकहिड आणि डग्लस यांसारख्या विमान बनविणा-या कंपनीमध्ये कशी चुरस होती, याची फारशी माहिती बाहेर येत नाही.
मिकी माऊसची कल्पना सूचली, ती डिस्नेच्या स्टुडिओत पळापळ करणा-या उंदरावरून किंवा फोर्ड कारखान्यात सुरुवातीला केवळ काळ्या रंगाचीच गाडी मिळत असे, अश्या चुरस कहाण्या या बोर्डरूमध्येच समजतात.
अनेक उदाहरणे देत, सोप्या आणि रंजक पद्धतीनं व्यवस्थापनशास्त्रातील मुलतत्वांचे धडे देरारं हे पुस्तक आहे. कार्पोरेट कंपन्या, त्यांची कार्यपद्धती आणि तेथील घडामोडी यांची झलकही पुस्तकात पाहायला मिळते.