"""एकूण दोनशेपेक्षा अधिक
रामकथा विविध व्यक्तिंनी लिहिल्या आहेत. छोट्या छोट्या कथांचा तर कुठे
हिशोबही नसावा याशिवाय अनेक माध्यमातून रामायण वाचलेजाते, ऐकले जाते, पाहिले जाते. ती गोडीच अशी अवीट, ते प्रसंग कंटाळवाणे नसल्यामुळे
लिहिणारांचे हात थकत नाहीत, वाचणारांचे डोळे थकत नाहीत, ऐकणारांचे कान
थकत नाहीत. उलट प्रत्येक वेळी अत्यंत उत्साहाने, नव्या स्फूर्तीने, रामकथा
लिहिली जाते, ऐकली जाते, सांगितली जाते..
अश्याच कथा, रामायणातील 52 अमृत कण ह्या पुस्तकात आहेत..."