"टिळक बाळ गंगाधर|
महाराष्ट्राचा कोहिनूर|
दूरदृष्टीचा सागर|
राजकारणी प्रवीण जो||
दासगणूंनी श्रीगजानन विजय ग्रंथात टिळकांची अशा प्रकारे स्तुती गायली आहे. 18 व्या शतकातील जगमगणारे कोहिनूरच होते ते!
आज शंभर वर्षांनंतर पण त्यांचे आदर्श, त्यांचे विचार प्रासंगिक आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहो, अजून आपल्या देशासमोर अनेक आह्वान आहेत. अनेक लक्ष्य गाठायचे आहेत. ते लक्ष्य गाठण्यासाठी आजच्या पीढीतील युवकांमध्ये टिळकांचे आदर्श रुजायला पाहिजे.
हाच उद्देश्य साधण्यासाठी शॉपिज़नच्या प्रतिभावंत लेखकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले.
त्यांचे लहानपण, त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्ये, त्यांची स्वाराज्याची परिभाषा, मंडाले जेल मधले त्यांचे अनुभव, गीतारहस्याची निर्मिती, 'केसरी' चे संपादन, त्यांना अभिप्रेत कर्मयोग, सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अगदी सारे सारे विषय हाताळले. मुख्य म्हणजे तरुण लेखकांनी पण ह्या निमित्ताने टिळकांवर अभ्यासपूर्ण लेखन केले.
"