अर्वाचीन कवितेतला मुक्तछंद आविष्कार अगणित कवींना मानवत नाही. तसेच वृत्त छंदात्मकतेच्या बारकाव्यांचा अभ्यास करणेही असंख्यांना मानवत नाही. अशावेळी मध्यम मार्ग म्हणून यमक जुळले की झाली कविता! असाही स्वांतसुखाय धोपट मार्ग असंख्यांनी चोखा ळलेला असतो. व्यक्त होण्याची ऊर्मी आणि छंदही, अशा हौशी काव्य लेखनाची प्रेरणा असतात. त्याच मार्गाचा विचार करताना रसिकाने अभ्यासाची तयारी दाखवली. आणि बऱ्याच कवितांमधून विशेषत: अष्टाक्षरी तंत्रातून तिने त्या अभ्यासाच्या सार्थकत्वाची चुणूक पण दाखवली आहे. तसेच गझल प्रकार पण हाताळायचे धारिष्ट्य ती दाखवू लागली आहे.ही आणखी विशेष उल्लेखनीय बाब.आणखी निर्दोष गजल लिहिता येण्याइतक्या काही पायऱ्या ती चढली आहे. तिच्या कवितांच्या अंतरंगाची ओळख करून घेण्यापूर्वी, ही एवढी प्रस्तावना पुरेशी आहे.- सौ. वीणा मालशे ,अकोला