//....आपली ओळख
आकाशात ढग जमले की
पाऊस यावा इतकी, सहज झालेली...
अन् ...ओठांना शब्दांची
कोवळी पालवी आलेली... //
सुंदर ओळी....!
अश्याच सुंदर ओळीत गुंफलेल्या नाजूक कविता, गुलाबाच्या नाजुक पाकळ्याच जणु.... आणि ह्या पाकळ्यांचा संग्रह म्हणजेच ""पद्मप्राक्तनाच्या पाकळ्या""
कवी विवेक जोशी ह्यांचा सुंदर काव्यसंग्रह!!!