वाचक हो, आपण ज्या पर्यावरणात राहतो
त्याचं काही ना काही देणं लागतो. हल्ली विकासाच्या दृष्टीने मानवाने
पर्यावरणाचे संतुलन बिघडवून टाकलेआहे. त्याचा परिणाम म्हणून आज
आपणास ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे. माझ्या लेखातून मी
नेहमी पर्यावरण, निसर्गआणि माझ्या बालपणाविषयीच्या जतन केलेल्या
आठवणींविषयी लिहीत असते. त्यातून समाज प्रबोधनही होते. वाचकांना
विचार करायला लावणारे असे माझे लेख खूप भावतात देखील. माझ्या
"अक्षरगोंदण" या पहिल्या लेखसंग्रहाला आपण भरभरून प्रतिसाद
दिलात तसाच प्रतिसाद माझ्या दुसऱ्या लेखसंग्रहालाही मिळावा ही
माफक अपेक्षा.