भाकरी हा महाराष्ट्रातील आहाराचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची भाकर रांधली जाते. भाकर कशी तयार होते याची गोष्ट सांगणारी ही फोटो-कथा. सातपुड्याच्या जंगलात वसलेल्या एका लहानशा खेड्यातल्या लाडकीबाई या पुस्तकात चुलीवर भाकर भाजून दाखवत आहेत. नादमय शब्दांनी नटलेली ही भाकरीची गोष्ट ग्रामीण भागातल्या ३ ते ८ वयोगटातील मुलांना अगदी आपलीशी वाटेल, तर शहरातल्या मुलांना ती वेगळ्या न पाहिलेल्या दुनियेत नेईल.